Indian_Blogs🇮🇳, Nature

Nature !

Don’t feel it before you sketch it, feel it after you finish it!

“Look at the right side with trees and birds where everything is going right and then to the left where not something, but everything, is going wrong.”

You know, if you believe in God, then you must need to save the nature because Nature is a soul of God. If you don’t believe in God then you need to believe in Nature. In short, save nature.

Can you too, feel the destruction pollution is causing to our beautiful nature by looking at the picture below? We all should.


My aim is just to tell you that we need to start working right now if we are to have a good future of humanity because as someone has said, “Only when the last tree has died and the last river has been poisoned and the last fish been caught will we realize we cannot eat money.”


We are all living in a illusion that we can visit places of nature and while returning, know that those will still be there when we go next time. But if we look at the current scenario, the pace with which we are harming the nature, we shouldn’t be surprised to not find a place of natural beauty in a few years where we can just go and appreciate the greens.

So, take steps to not let that happen. Start doing something on a personal level. Every single sustainable habit matters. Try your best to say no to pollution and to find a way to reduce it.

To curb pollution, you can do some of the following things:

  • Reduce, Reuse, Recycle (3R मंत्र ) anything and everything that you can
  • Use reusable water bottles and containers made out of metals or earthenware
  • Use public transport or bicycle for travelling as much as possible (Burn fat, not fuel)

Own and account yourself to the स्वच्छ भारत मिशन because without your support, it cannot succeed but with your support it can sow the seed for a beautiful, clean future.

Darker the night, brighter the stars.

“The world has enough for everyone’s need, but not enough for everyone’s greed.” -Mahatma Gandhi

You know, if you become a friend of nature’s then you will be surprised to see the ammount of goodness it has to share with you. The animals will take care to hustle around you when you feel alone, the flowers will make sure to uplift you when you feel low and the greens will shed a leaf on you to tell you that they are there for you.

In short, “Love Nature, Nature will love you back.”


“एका झाडाच्या रोपांच मनोगत…”

(पर्यावरण दिनाच्या औचित्याने)

मी एक छोटंस झाडाचं पिल्लू… जशी तुमच्या घरात दुडदुडणारी निरागस लेकर…तसेच मीही लेकरू एका टुमदार झाडाचं… माझं हे गोजीरं रूप पाहून तुम्हाला कधीतरी तुमच्या घरातल्या तानुल्यांची आठवण झाली असेलच. लहानपण मुळात खूप गोड आणि सुंदर असत ना? आज माझं रोपनं होणार आहे. या सुंदर जगात आज माझी मूळ रोवली जाणार आहेत. आज खरं पाहिलं तर मला खूप कौतुक वाटायला पाहिजे स्वतःच, कारण आज मी स्वतंत्र होणार,आज पासून माझा नवीन प्रवास सुरु होणार.. पण तरी मी खुश होण्याऐवजी मी घाबरलोय. मला भीती वाटतेय.

दरवर्षी माझे कित्येक भावंड अशीच जमिनीत रोवली जात होती. रोवताना माणसाच्या कौतुकाचा वर्षाव त्याक्षणी माझ्या भावंडावर होत होता. कुणी सुंदर खड्ड्याची रचना त्यांच्या विसाव्यासाठी केली होती, तर कुणी मानवी हातानं पडणाऱ्या पावसाच्या यंत्राची सोय केली होती. झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणांनी माझ्या भावंडांचा सगळीकडे जयजयकार होत होता. काय सोहळा रंगला त्यावेळी. मला त्यावेळी माझ्या भावंडाबद्दल अप्रूप वाटलं होतं, आता माझ्या भावंडांच कल्याण झालं असंच आम्हा लहानग्यांना वाटत होतं. माणसाचा घोळका, आमच्या भावंडाना त्या रचलेल्या खड्यात टाकून, त्यावर त्यांच्या सहचरणी धरणीचे मातीरूपी आवरण टाकून त्यावर पाण्याचा शिडकावा करत होता. त्यावेळी एखाद्या राजा महाराजांचा असावा तसा थाट माझ्या भावंडांचा होता. घोळक्या घोळक्यानं आमच्या भावंडासोबत माणसं फोटो काढत होते. कुणी परत परत हात लावत होत. कुणी एकटं एकटच सेल्फी का काय म्हणत मोबाइल घेऊन फिरत होत. त्यादिवशी झालेल्या कौतुकानं आणि सोहळ्यांन आमच्या भावंडांच्या मनात गगनचुंबी झेप घेण्याची उर्मी जागी झाली असावी. माणसाच्या या आपलेपणाच्या वागणुकीतून वटवृक्षाची मजल मारण्याचा जणू आमची भावंडे संकल्प करत होती…त्यांच्या समोर उभी राहून फोटो काढलेली माणसे दुसऱ्यादिवशी आमच्याच बापजादयाच्या शरीरापासून तयार केलेल्या कागदावर छापून आली होती. त्या छापून आलेल्या कागदावर माणसाच्या घोळक्यात आमची भावंडे खुजी वाटत होती. रोपण कर्यांसाठी आलेल्या माणसांच्या भाषणाची शब्दवळ उमटताना त्या कागदाची पाने त्रासिक वाटत होती. त्या कागदांची कात्रणे करून हि झाडे लावणारी माणसे दुसऱ्या दिवशी त्या कागदातच गुंग होती; त्यावेळी आमची भावंडे त्या रोवलेल्या मातीत एकाकी पडली होती. त्यादिवशी त्यांनी आलेल्या माणसांची खूप आतुरतेनं वाट पाहिली. दुसऱ्या दिवशीही तेच झालं… दिवसामागून दिवस गेले पण फोटो काढणाऱ्यापैकी कुणी परत आमच्या भावंडाकडे फिरकले सुद्धा नाही. त्या माणसाची अशाच या ना त्याकारणी कागदावर फोटो छापून येत होते. पण प्रत्येक फोटोत आमच्या भावंडा ऐवजी दुसरे कशा कशाचे फोटो येत होते.

इकडे एकाकी पडलेली भावंडे पाण्यावाचून तडपत होती. आकाशातून आग ओकणारा सूर्य पाहण्याची त्यांच्यात ताकत राहिली नव्हती. एका पाण्याच्या शिडकाव्यासाठी त्यांचा जीव कासावीस होत होता. स्वावलंबी असणारी आमची भावंडे शेवटच्या श्वासापर्यंत एकाकी झुंज देत होती. जंगलात पडलेल्या बिया तरी स्वतःच्या हिमतीवर दिमाखात वटवृक्षागत उभ्या राहतात, पण पोटातच स्वतःची मुले मारणारी माणसाची हि पिलावळ, आमच्या भावंडाच्या जगण्याची कुठे पर्वा करणार होती. आता आमच्या भावंडांची जगण्याची उमेद आणि लढाई करण्याची ताकत संपली होती. ज्या माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या कित्येक बापजाद्यांचा खून केला तीच माणसे आमच्या निरपराध चिमुकल्या भावंडांचा गळा दाबून खून करताना पाहून, त्यावेळी माझ्या मनात बसलेली ती धास्ती आज मला माणसाच्या हातात जाताना दम घोटल्यागत वाटतेय. मला जन्म देण्याचा कि माझा खून करण्याचा सोहळा रंगणार आहे याच कल्पनेनं माझी घाबरगुंडी उडतेय….

त्याच घाबरगुडीतून माणसांना एक विनंती करतो…

मला ज्या प्रेमान लावणार आहात ना त्या प्रेमानं मला बळही द्या… उगवण्या आधीच माझा कोंब खुडु नका….

आणि तेही करणार नसाल…
तर माझं वृक्षारोपण नाही केलं तरी चालेल, आम्ही स्वावलंबी आहोत, कशेही उगु आणि कशेही जगू….

एका झाडाचं रोप…


By Vishal Palve @18/12/2018 3:36 AM
Advertisement

5 thoughts on “Nature !”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s