- विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्या साठी दगड उचलावा.
- दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.
- पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.
- तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
- वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
- फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि… अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न. करावा.
यालाच ‘जीवन’ म्हणतात …….
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत
जगायला गेलं तर दु:खातही सुख असत
चालायला गेलं तर निखारेही फूले होतात
तोंड देता आले तर संकटही शुल्लक असत
वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असत
पचवायला गेलं तर अपयशही सोपे असत
हसायला गेल तर रडणेही आपल असत
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं.
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर शोधण्या साठी जन्मायचं असतं…
पैसे नसतात तेव्हा माणूस झाडपाला खाऊन दिवस काढतो पैसा आल्यावर हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो
पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिममध्ये व्यायामा साठी चालवतो.
पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते.
पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्या साठी करतो.
माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो.
पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.
पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो.
पैसे नसतात तेंव्हा मिठाई खावीशी वाटते पैसे आल्यावर मधुमेहा मुळे खाता येत नाही.
पैसे नसतात तेंव्हा भूक लागते , झोप येते पैसे आल्यावर दोन्ही साठी औषध घ्यावे लागते
माणसा रे माणसा… तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यु नंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही.
परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्या करिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीली खरी कमाई असेल…
तुमचे आणि माझे हे नाते माझ्या साठी अनमोल आहे …
आज प्रत्येक जण आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट करतो,
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही..!
मला आवडलं म्हणून तर आपल्याला पाठवलं. पुढे पाठवा हा आग्रह नाहीच. चांगला विचार व चांगली सोबत अवश्य सांभाळून ठेवावी….
– Anonymous
⭕Click Below To;
🌐Visit LR | 🔗Join LR |
🤔Read FAQ | 🔊Get Audiobooks |
🙏Our Message | 👥Collaborate |